राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसने 19 उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीमधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोणता उमेदवार द्यायचा याचाही तिढा सुटला आहे.
चौथ्या यादीमध्ये 19 उमेदवारांची आणि मतदारसंघाची नावे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपूरमध्ये काँग्रेसने आशिष देशमुख यांना मैदानात उतरवले आहे. नागपूर दक्षिण मतदारसंघातून फडणवीस यांच्यापुढे आव्हान उभे करतील.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi