कर्माची ताकद फार मोठी असते!

कर्माची ताकद फार मोठी असते!

एकदा एका जंगलात एक माणूस मासा पकडायला तलावाजवळ जातो. तासन् तास बसून आणि प्रयत्न करून देखील त्याला मासा मिळत नाही आणि जेव्हा मासा मिळतो. तेव्हा एक माणूस येऊन त्या माणसाला धक्का मारून तो मासा त्याच्याकडून हिसकावून घेतो.

तेव्हा अर्धमेला मासा त्याच्या बोटाचा चावा घेतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्याला बोट कापायला सांगतात कारण जखम वाढलेली असते.

बोट कापल्यानंतर निराश होऊन तो घरी येतो मात्र त्याला याचं समाधान असतं कि, आपल्याला आता बरं वाटेल. मात्र जखम पुन्हा वाढते आणि त्याला पर्यायाने हात कापावा लागतो.

त्याचा मित्र त्याला भेटायला येतो आणि त्याला विचारतो कि, “तुझ्या हातून काही दुष्कर्म झाले आहे का?” तेव्हा त्याला त्याने केलेल्या चुकीच्या कृत्याची जाणीव होते.

तुटलेला हात घेऊन तो तसाच जंगलातल्या माणसाला भेटायला जातो. तो माणूस भेटल्यावर हा तसाच त्याला लोटांगण घालून विचारतो, ” तू, मी तुझा मासा हिसकावल्यावर वर पाहून का हसलास?”

त्यावर तो उत्तरतो, ” मला कर्माची ताकद माहित आहे. तू मला तुझी ताकद दाखवली, तुला कर्माची ताकद कळावी हीच प्रार्थना मी देवाकडे केली.”

सांगायचे तात्पर्य असे कि, दुसऱ्यांची कुठलीही गोष्ट ओरबाडून घेऊन आपण सुखी होऊ शकत नाही. कर्म आपल्याला आपली जागा दाखवतेच.

धिरज करळे: