करमाळ्यात रश्मी बागल यांना शिवसेनेची उमेदवारी, नारायण पाटलांचा पत्ता कट

सोलापूर | करमाळा मतदारसंघातून शिवसेनेने अखेर रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराचा पत्ता कट केला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट झाला आहे.

रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे विद्यमान आमदारांविषयी विचार केला जात होता. राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांच्या संदर्भात शिवसेनेने विचापूर्वक निर्णय घेतला. दोन दिवसापूर्वी रश्मी बागल या‘मातोश्री’वर आल्या होत्या. त्या सकाळपासून मातोश्रीवर होत्या. त्या रात्री रिकाम्या हाताने परत गेल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल यांच्याकडून देण्यात आलं होतं. मात्र विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी रश्मी बागल यांचा विरोध केला होता. मात्र अखेर शिवसेनेने त्यांचा पत्ता कट करत रश्मी बागल यांच्या पदरात तिकीट टाकले आहे.

रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी घेतली. त्यांना सेनेकडून तिकीट देण्यात आले. मात्र स्थानिक शिवसेना आमदार यावर नाराज आहेत. मला तिकीट न मिळाल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, असंही नारायण पाटील म्हणाले होते. शिवाय त्यांनी त्यांची भूमिका पक्षासमोरही मांडली होती. आता रश्मी बागल यांना किती मतं मिळतात. त्या मतदारसंघ शिवसेनेकडे राखू शकतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: