अमित शाहांच्या उपस्थितीत होणार सावरगाव घाट च्या दसरा मेळाव्याला अमित शहा येणार; पंकजा मुंडेंची फेसबूक पोस्ट

बीड | विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. राज्यात निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन करण्यासाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे.

बीडमध्येही पंकजा मुंडे आपल्या विजयाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यंदाचा दसरा मेळावा अमित शहा यांच्या उपस्थितीत सावरगाव घाट येथे होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.

आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बुधवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या बातमीला दुजोरा देणारी फेसबूक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना “चलो भगवान भक्तीगड सावरगाव घाट” अशी साद घातली आहे.

यंदाचा दसरा मेळावा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत होत आहे. त्यामुळे या मेळव्याला प्रचंड महत्व आले आहे. मागील तीन वर्षापासून पंकजा मुंडे भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेतात.

या ठिकाणी त्यांनी श्री संत भगवान बाबांची “बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी” अशी मुर्ती बसवली आहे. या स्थळाचं त्यांनी “भगवान भक्तीगड” असे नामकरणही केले आहे. ‘भक्ती आणि शक्तीचा संगम’ म्हणत 8 ऑक्टोबर रोजी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: