कंदर,जेऊरचा विजपुरवठा खंडीत,बार्शीतील नगराध्यक्षांचे रास्ता रोको आंदोलन महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर स्थगीत

गणेश भोळे/धीरज करळे

बार्शी : बार्शी शहरास पाणी पुरवठा करणाºया कंदर हेडवर्क्स येथील विजपुरवठा मागील तीन दिवसांपासून वारंवार खंडीत होत असून त्यामूळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे ़ हा विजपुरवठा सुरळीत करावा तसेच महावितरण कंपनीच्या निषेधार्थ बार्शी शहर व तालुका भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानक चौकात होणारे रास्तारोको व ठिय्या आंदोलन गुरुवारी पोलीसांच्या मध्यस्थीने महावितरणच्या अधिकाºयांनी विज पुरवठा खंडीत होणार नाही अशाप्रकारे लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले .
बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी वीज वितरणला निवेदन देऊन गुरुवारी बसस्थानक चौकात रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता .त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की , ३ जून पासून कंदर येथील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे . यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो . जेऊर येथूनही चार ते पाचवेळा वीजपूरवठा खंडीत झाला आहे . त्यामूळे पाईपलाईन गळतीचे प्रमाण वाढले आहे .याचा परिणाम म्हणून शहरात तीन दिवसाआड ऐवजी चार ते पाच दिवसांआड पाणीपूरवठा करावा लागत आहे .वीज वितरणच्या दिरंगाईमुळेच हा प्रकार घडत असून या निषेधार्थ रास्तारोको आंदोलनाचा मार्ग स्विकारला असे म्हटले आहे .
या आंदोलनासाठी नगराध्यक्षासह माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक विजय राऊत, गटनेते दिपक राऊत , रावसाहेब मनगिरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बस स्थानक चौकात जमा झाले होते़ याप्रकरणी शहर पोलिस पोलिस स्टेशनचे पो़नि़ सर्जेराव पाटील यांनी वीजवितरणचे जेऊर विभागाचे उपकार्यकारी अभियंता ए़बी़ गलांडे ओ़एस़ परीट,पी़जी़ उईके ,एल़एच़ शिंदे ,कन्हैयालाल ठाकूर , आनंद गाडेकर , कांबळे हे अधिकारी व भाजपाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली़़
महावितरणच्या वतीने कंदर आणि जेऊर येथे वादळामुळे तसेच पाऊस यामूळे वीजपुरवठा खंडीत झाला होता . यापूढे वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेतली जाईल़आपत्कालिन परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन नगराध्यक्षांना दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले .यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महावितरण विरोधी घोषणा दिल्या़

admin: