सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात,१० ते १५ जण जखमी,बस जळून खाक

सोलापूर- शहरातील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सोलापूर-पुणे महामार्गावर ही घटना घडली. यामध्ये १० ते १५ जण जखमी झाले असून, ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

अपघात झालेली बस ही हैदराबादकडून पंढरपूरकडे जात होती. ही बस ट्रकवर मागून आदळल्याने बसने पेट घेतला. जखमीपैंकी ५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

admin: