महाराष्ट्रातील राजकारणात सोमवरचा दिवसही लक्षवेधक ठरला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या सुमारे १६२ आमदारांची सोमवारी मुंबईतील पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये परेड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आमदारांना संविधानाची शपथ देऊन कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याची, भाजपला साथ न देण्याची व महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहण्याची शपथ देण्यात आली. तर तिकडे भाजपने महाविकास आघाडीच्या या परेडची खिल्ली उडवण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला. बुधवारी, २७ नोव्हेंबर रोजीच विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करा आणि पाच वाजण्याच्या आत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.
विश्वासदर्शक ठरावासाठी आणि आमदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जावी.