मुंबई । मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये झालेल्या तिन्ही पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याची माहीती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री मिळू शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्व करावे अशी इच्छा असल्याची माहीती आहे.
राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने आतिशय महत्वपूर्ण बैठक झाली. संपूर्ण राज्याच्या या बैठकीकडे लक्ष लागले होते. मात्र, तब्बल दोन तासांच्या बैठकीनंतरही यातून काही ठोस बाहेर येवू शकले नाही. आमची सर्व मु्द्द्यांवर व्यापक चर्चा झाली. आम्हला एकही मुद्दा आम्हाला अनुत्तरीत ठेवायचा नाही. जवळपास सर्व मुद्दयांवर एकमत झाले आहे. सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच आम्ही माध्यमासमोर येवून घोषणा करू असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
दरम्यान, ठाकरे कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने आतापर्यंत मंत्रीपद भुषवलेले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे कुटुबातून मंत्रीपद भुषविणारे ते पहिले व्यक्ती असतील. यापूर्वी ठाकरे घराण्यातील कोणीही निवडणूक देखील लढवली नव्हती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणूकीत आदित्य़ ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून ते विजयी झाले व विधानसभेत पोहचले.