मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केले. महाविकासआघडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली आहे. लवकरच म्हणजे 1 डिसेंबरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होणार आहे.
ट्रायडंट हॉटेलमध्ये तिन्ही पक्षाच्यां आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात हा ठराव संमत करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी ठरावाची सुचना मांडली आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घोषणा होताच त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि थोरात यांनी ठाकरे यांचे अभिनंदन केले.
————————
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi