मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आज राज्यात स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम घेत काम करतील.’
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi