मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या दौऱ्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ही कारवाई केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
मी राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नव्हतो, तरीही ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर मी त्याचे स्वागत करतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे कारवाई करून जनतेत जो काही संदेश जायचा आहे तो गेला आहे, याची प्रतिक्रिया राज्यातील जनता नक्की देईल अस पवार यावेळी म्हणाले.
माझ्या राज्यातील दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अशी कारवाई झाली नसती तर नवल वाटले असते. या गोष्टीशी माझा कोणताही संबंध नसताना हा गुन्हा दाखल झाला असेल तर मी गुन्हा दाखल करणाऱ्या संस्थांचा खूप आभारी आहे. याचा जो काही संदेश राज्यातील जनतेकडे जायचा तो नक्कीच जाणार आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.