इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडवणार-देवेंद्र फडणवीस ,बारामतीच्या प्रचाराची सांगता

इंदापूर: 1991 साली पुतण्याला तिकिट मिळाले तेव्हा पासून, या इंदापूर बारामतीला प्रायवेट प्राॅपर्टी समजून पवारांनी राजकारण केले. लोकसभेच्या निवडणूका आल्या की दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांना दोन्ही बगलेत घेतात आणि विधानसभेला आमने सामने आणतात. आत्ताही हेच होणार त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना एक मित्र म्हणून सांगतो तुम्ही कितीही पालख्या उचलल्या तरी तुम्हाला विधानसभेला ते चितपट केल्याशिवाय राहणार नाहीत. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी इंदापूर येथील सभेत हर्षवर्धन पाटील यांना भाजपाचे निमंत्रणचं दिले.
पाकिस्तान ने हल्ला केला तर मोदींनी घरात घुसून ठोकले. आता सुळे म्हणतात घरात घूसून ठोकीन या शब्दात इंदापूर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा समाचार घेतला. तर सुळेंच्या व्हायरल क्लिप वरुनही चिमटा काढलाय. ते आज कांचन कुल यांच्या व तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या सांगता सभेत इंदापूर येथे बोलत होते.यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्रि पंकजा मुंडे, महादेव जानकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच सभांना मतदारांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. आता वेळ आली आहे, खुलेपणाच्या आणि विकासाच्या राजकारणाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची. आज केंद्रातील मोदी सरकार गरिबांसाठी अनेक योजनांद्वारे काम करीत आहे. गरिबांसाठी घरे, आयुष्मान भारतच्या माध्यमांतून चांगल्या आरोग्य सेवा आणि इतरही अनेक योजनांच्या माध्यमातून कामे केली जात आहे. मला खात्री आहे की, इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडविणार आणि आपण सारे या इतिहासाचे साक्षीदार असणार.

admin: