आर्मीमध्ये ऑन ड्युटी असलेल्या बार्शीतील या जवानाने पुरग्रस्तासाठी केली एवढी मदत

बार्शी : सांगली -कोल्हापूर भागात कृष्णा, कोयना, पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे लाखो लोक विस्थापित होऊन कित्येकांचे जीव गेले, जनावरे दगावली, शेतीचे कधीही भरुन न येणारे नूकसान झाले़ आता पुराचे पाणी ओसरु लागल्याने किती नूकसान झाले याचा अंदाज येऊ लागला आहे़ या पुरग्रस्तांसाठी राज्याच्या कानाकोपºयातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे़ जो-तो आपल्या परीने मदत करीत आहे.

देशाच्या हवाईदलात कार्यरत असलेल्या प्रसाद दिलीपकुमार डमरे या आर्मीमॅनने आपल्या एक महिन्याच्या ४६ हजार रुपये पगारात आणखी २४ हजार रुपये भर घालून सत्त्तर हजार रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सैनिकामार्फत पाठवून देऊन खºया अर्थाने देशप्रेम व सामजिक बांधीलकी जोपासली आहे.

सध्या यापुरग्रस्त भागात गेल्या आठ ते दहा दिवसापासून आर्मीच्या जवांनानी मोठ्या प्रमाणात माणसांना पुरातून बाहेर काढत अनेकांचे जीव वाचवले आहेत़ त्यामुळे हे आर्मी जवान देशातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत़ जेव्हा जेव्हा असा कठीण प्रसंग येतो तेंव्हा सर्वात अगोदर आठवते ती आर्मी़ बार्शीतील माजी नगरसेवक दिलीप डमरे यांची दोन्ही मुले आर्मीमध्ये आहेत.

यातील प्रसाद याचे १२ सायन्स चे शिक्षण शिवाजी महाविद्यालयात पूर्ण झाल्यानंतर तो गेल्या सहा वर्षापुर्वी आर्मीमध्ये भरती झाला़सध्या प्रसाद हे जोधपूर राजस्थान येथील आर्मी एविएशन कोर मध्ये हेलिकॉप्टप टेकनीशयन म्हणून देश सेवा करीत आहेत़ त्याठिकाणी हे ड्युटीवर असल्यामुळे सांगली भागात येऊ शकत नव्हते,मात्र त्यांना आपला देखील यामध्ये मदतीचा कांहीतरी वाटा असला पाहिजे या जाणीवेतूत त्यांचा एक महिन्याचा पगार ४६ हजार व त्यात आणखी २४ हजाराची भर टाकून सत्तर हजाराचा धनादेश त्यांचे कांही सहकारी जवान नाशिकला गेले असता त्यांच्याकडे डमरे यांनी तो पाठवून दिला़ त्यांच्या या सामाजिक जाणीवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा,ग्लोबल मीडिया सोल्युशन्स

ग्लोबल न्युज नेटवर्क: