आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने मोठी झेप घेतली आहे. बुमराह आतापर्यंतच्या सर्वोच्च अशा तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरीचे फळ बुमराहला मिळाले आहे.
बुमराहकडे आता 835 गुण झाले असून गेल्याच आठवड्यात त्याने टॉप 10 मध्ये जागा मिळवली होती.
नुकतीच विंडीजविरुद्ध झालेली दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने निर्भेळ यश मिळवले. या मालिकेत वेगवान गोलंदजा बुमराहने आपली छाप सोडली. दोन कसोटीत बुमराहने 13 बळी मिळवले. यात त्याच्या हॅटट्रीकचाही समावेश आहे. हरभजन सिंग आणि इरफान पठानंतर हॅटट्रीक नोंदवणारा तो तिसरा गोलंदाज ठरला.
बुमराने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत सर्वश्रेष्ठ कामगिरी करत 5 फलंदाजांना अवघ्या 7 धावांत बाद केला. ही जादुई कामगिरी दुसऱ्या कसोटीतही दिसून आली आणि हॅटट्रीकसह त्याने 27 धावात 7 बळी घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.