आमदार की लगेच राज्यमंत्री मंत्री असलेल्या ‘मामा’ मुळे या भाच्याची लागली मंत्रिमंडळात लॉटरी

गेले महिनाभर चर्चेत असलेला महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह घटकपक्षातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षित नावांसह काही अनपेक्षित नावेही समोर आली आहेत.

या मंत्रिमंडळाच्या यादीकडे नजर टाकल्यास नात्यागोत्याचे राजकारण पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे यांच्यासह आणखी काही नावांचा समावेश आहे.

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत. आमदारकीची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. प्राजक्त तनपुरे यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे २५ वर्षे आमदार आणि एकदा खासदार होते. त्यांच्या आई उषा तनपुरे याही नगराध्यक्षा होत्या. प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपद मिळावे म्हणून जयंत पाटील हे आग्रही होते, असे बोलले जाते. 

प्राजक्त तनपुरे हे विद्यमान नगराध्यक्षही आहेत. अभियांत्रिकीतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या रुपाने राहुरीला प्रथमच मंत्रिपद मिळाले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: