आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून होमिओपॅथी औषध व सॅनिटायझरचे वाटप…..!

आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून होमिओपॅथी औषध व सॅनिटायझरचे वाटप…..!

ग्लोबल न्युज: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे तरुण आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्फत दक्षिण मतदार संघ आणि कसबा बवड्यातील कुटुंबांना एक लाख आर्सेनिक अल्बम 30 च्या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या तसेच सलून, दळप गिरणी, ग्रामपंचायत, दूध डेअरी, छोट्या मोठ्या सोसायटी आदी संस्थांना १०,००० सॅनिटायझर स्प्रे बॉटलच्या वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, यांच्या उपस्थितीत झाला.

या विषयी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांच्या काळात डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच कोल्हापूर दक्षिण मतदार संघ आणि कसबा बावडा इथं रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक एल्बम-30 या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे टप्याटप्याने वाटप करण्यात येणार आहे.

तसेच कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणेही तितकेच महत्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकमेकाच्या संपर्कात येत असतात. त्यावेळी जास्त काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच दक्षिण मतदारसंघ तसेच कसबा बावडा येथील सार्वजनिक ठिकाणी अर्धा लिटर क्षमतेच्या दहा हजार कायमस्वरूपी वापरता येतील अशा सॅनिटायझर स्प्रे बॉटल देण्यात येणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: