बार्शी: सोपलांच्या मार्गदर्शनाखाली दहा वर्षापुर्वी शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या, वेळेवर पाणी पुरवठा केला, चांगले रस्ते बांधले पण आज या शहरातील नागरिकांना अतिशय यातना देण्याचे काम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका सत्ताधार्यांनी केले आहे. पालिका कर्जबाजारी करून लुटली आहे. पालिका कर्मचार्यांचे पगार सुध्दा वेळेवर दिले जात नाहीत अशी परिस्थिती आहे अशी टीका बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी केली.
शहरातील पांडे चौकात शुक्रवारी सांयक़ाळी आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते माजी नगरसेवक शशिकांत गव्हाणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उमेदवार दिलीप सोपल ,महाहौसिगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल काकडे, शहरप्रमुख दिपक आंधळकर, पालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, माजी उपनराध्यक्ष आबा पवार, माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण, युवानेते आर्यन सोपल, बाजार समितीचे संचालक साहेबराव देशमुख, माजी नगरसेवक राजाभाऊ काकडे, वाहिदपाशा शेख, सुशिल पाटील, माजी नगरसेवक नागजी नान्नजकर आदी उपस्थित होते.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi