आनंदाची वार्ता..भीमा खोरे धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू

पार्थ आराध्ये

पुणे- गतवर्षीचा दुष्काळ व यंदा लांबलेल्या मान्सूनमुळे उजनीच्या लाभक्षेत्रासह भीमा व नीरा खोर्‍यात चिंतेचे वातावरण होते. जून महिना संपता संपता पर्जन्यराजाने अखेर धरणांवर जोरदार हजेरी लावली असून वडीवळे प्रकल्प परिसरात विक्रमी 350 मिलीमीटर पाऊस चोवीस तासात कोसळला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यानंतरच उजनीला पाणी मिळणार असून हे धरण वजा 58.87 अशा चिंताजनक स्थितीत आहे.

भीमा व नीरा खोर्‍यातील बहुंताश धरणांवर मागील चोवीस तासात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ सुरू होवून एक महिना झाला असला तरी अद्याप भीमा खोर्‍यातील नऊ प्रकल्पांची स्थिती ही शुन्य टक्के आहे. यावरूनच यंदा पावसाची किती गरज आहे हे लक्षात येते.

यातच मान्सूनचे उशिरा झालेले आगमन यामुळे तर चिंतेचे वातावरण वाढले होते. सर्वात महाकाय असणार्‍या उजनी धरणाची स्थिती वजा 58.87 टक्के असून हा प्रकल्प भरण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे.

शुक्रवार सकाळपासून भीमा व नीरा खोर्‍यातील धरणांवर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. यात कलमोडी धरणावर 81 मि.मी., चासकमान 65, भामा आसखेडा 113, वडीवळे 350, आंध्रा 132, पवना 158, कासारसाई 98, मुळशी 131, टेमघर 197, वरसगाव 151 तर खडकवासला धरणावर 76 मिलीमीटरची नोंद आहे.

नीरा खोर्‍यातील गुंजवणी प्रकल्पावर 132 मि.मी., देवघरवर 74, भाटघर 27 मि.मी.पावसाची नोंद आहे. टेल एन्डला असणार्‍या वीर धरणावर केवळ 11 तर उजनीवर 7 मि.मी.पावसाची नोंद आहे. दरम्यान पावसाचा जोर शनिवारी पहाटेपासून ही कायम आहे.

इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, घोड या नद्यांच्या परिसरात पर्जन्यराजा आता बरसू लागला आहे. घोड उपखोर्‍यातील पिंपळगाव जोगे वर 22, माणिकडोह 42, येडगाव 27, वडज 29 तर डिंभे प्रकल्पावर 64 मि.मी. ची नोंद आहे.

उजनीची अवस्था

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनीची पाणी पातळी 485.178 मीटर असून या प्रकल्पात एकूण शिल्लक साठा 909 दशलक्ष घनमीटरचा आहे. मृतसाठ्यातील 893 दलघमी (31.54 टीएमसी ) पाण्याचा वापर झाला आहे. धरण वजा 58.87 टक्के आहे.

भीमा खोर्‍यातील धरणांची स्थिती
पिंपळगाव जोगे 0 टक्के, माणिकडोह 0.48, येडगाव 0, वडज 0, डिंभे 0, घोड 0,विसापूर 0.63, कळमोडी 16.94, चासकमान 2.89, भामा आसखेडा 8.38, वडीवळे 32.51 , आंध्रा 33.81, पवना 13.95. , कासारसाई 8.22 , मुळशी 1.04 , टेमघर 0, वरसगाव 5.62 , पानशेत 13.36, खडकवासला 20.91 टक्के .

नीरा खोर्‍यातील धरणांची स्थिती

गुंजवणी 8.90 टक्के, देवघर 2.19, भाटघर 5.84, वीर 4.59 , नाझरे 0 टक्के

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: