ग्लोबल न्यूज नेटवर्क: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षात मतभेद आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.त्याला कारण ही तसेच आहे मुखमंत्र्यांशी संबंधित एका पेजवर आदित्य ठाकरेंना त्याची जागा दाखवाच अशी वादग्रस्त पोस्ट टाकली गेली आहे.
पुन्हा नरेंद्र पुनः देवेंद्र मिशन 2019 या फेसबुक पेजवर आदित्य ठाकरेला त्याची जागा दाखवाच!
वरळीकरांनो,हा आदित्य ठाकरे यंदा तुमच्या क्षेत्रातून निवडणूक लढतोय.रोज किड्यामुंग्यांसारखा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची स्थिती बदलेल अशा मेट्रो ३ प्रकल्पाला याचा विरोध आहे.
https://www.facebook.com/1987491428148412/posts/2474064202824463/
यावरून दिसते कि याला मुंबईकरांच्या जीवाची किती काळजी आहे! येत्या निवडणुकीत याला मतदान न करता सणसणीत उत्तर द्या! अशा प्रकारचा मजकूर असलेली पोस्ट व्हयरल केली आहे. या पोस्ट सोबत मुंबईमधील ट्रॅफिक जॅम चा फोटो दिलेला आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi