आता लॉकडाऊन नाही,सरकार उचलणार ‘ही’ पाऊले.

आता लॉकडाऊन नाही, सरकार उचलणार ही पाऊले
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला होता.आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून तो १७ मे रोजी संपणार आहे.


पण हा लॉकडाऊन १७ मेनंतरही सुरू राहणार की सरकार काही पाउल उचलणार आहे? सरकार आता पूर्ण जिल्हा किंवा शहरात निर्बंध न घालता फक्त हॉटस्पॉट असलेले भाग सील करण्यात येतील,
अशी माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कंटेन्मेंट झोन वगळून उद्योग- व्यवसायांना सरकारने आधीच परवानगी दिली आहे.

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने याशिवायही आणखीही काही निर्णय घेतले आहेत. यात उत्पादन आणि किरकोळ विक्रीचा समावेश आहे. काही राज्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या भागांवर निर्बंध घातले आहेत.
यामुळे मजुरांच्या कमतरतेने आर्थिक उलाढाल सुरू झालेली नाही. मजुरांअभावी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
परिणामी मालाची वाहतूक थांबली आहे. लॉकडाऊन पूर्वी २२ लाख ई-वे बिल भरले जात होते. आता ही संख्या ६ लाखांवर आली आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला ही संख्या फक्त ३.२ लाख इतकी होती. गेल्या तीन आठवड्यात त्यात दुप्पाट वाढ झाली आहे.

देशातील काही भागांमध्ये करोनाचा धोका वाढताना दिसतोय तर काही ठिकाणी हा धोका नियंत्रणातही आलाय.
तसंच गोवा, मिझोराम ही राज्य करोनामुक्त झालीत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
दुपारी ३.०० वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही चर्चा पार पडणार आहे. देशात करोनाशी निगडीत वेगवेगळ्या मुद्यांवर ही चर्चा पार पडणार आहे.

admin: