चिनी सोशल मीडिया अॅप टिकटॉक (Tiktok) आणि हेलो (Helo) यांच्या वापरावर भारतात बंदी येण्याची शक्यता

खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन

वृत्तसंकलन: गुरुराज माशाळ

नवी दिल्ली: जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादा विरोधात कारवाया करीत नाही तोपर्यंत भारत आपल्या सुरक्षेसाठी एअर स्ट्राइकसारखी कडक पावले उचलत राहील, अशा शब्दांत केंद्र सरकारने पाकिस्तानाला पुन्हा एकदा बजावले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. पाकिस्ताननं जाधव यांची सुटका करावी अशी मागणी करतानाच, जाधव यांच्यासाठी सरकारचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नवी दिल्ली: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; राज्यात तेल आणि वायू उत्पादनाच्या वाढीसंदर्भात केली चर्चा.

नवी दिल्ली : चिनी सोशल मीडिया अॅप टिकटॉक (Tiktok) आणि हेलो (Helo) यांच्या वापरावर भारतात बंदी येण्याची शक्यता; या अॅपच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये केली जात असल्याची तक्रार आल्याने केंद्र सरकारने या अॅपच्या अधिकाऱ्यांना २४ प्रश्नांची नोटीस पाठवली आहे.

उत्तर प्रदेश: प्रियांका गांधी यांचं योगी आदित्यनाथ यांना पत्र; उत्तर प्रदेश दौऱ्यावेळी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचं केलं कौतुक, मात्र नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीनं सुरक्षा देण्याची केली विनंती.

गुजरात : गुजरातमधील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकुर आणि आमदार धवलसिंह झाला यांनी आज गुजरात भाजपा अध्यक्ष जितू वाघाणी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

बंगळुरू : कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई यांनी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना पत्र लिहून आज दुपारी शुक्रवारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषदा बरखास्त करण्यात आल्या. यामध्ये नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांचा समावेश.

मुंबई : भाजपा सदस्य इशरत जहाँ यांना हनुमान चालिसा वाचन कार्यक्रमात सहभागी झाल्याने आपल्या पतीचा भाऊ आणि घरमालक धमकावत असल्याचा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ प्रदीप शर्मा राजकारणात एंट्री करणार असल्याचे माहिती, शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे : शेतकर्‍यांच्या विम्याच्या प्रश्नावर मोर्चा काढायचा होता तर मुंबईत अधिवेशन काळात विधी मंडळावर का नाही काढला – अजित पवार यांचा शिवसेनेला सवाल.

शिर्डी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साई मंदिराच्या दानपेटीत गुरुपोर्णिमेला तब्बल साडे चार कोटींचे दान जमा झाले आहे. यामध्ये रोखरक्कम, बँक चेक, ड्राफ्ट तसेच सोने चांदी आणि सतरा देशांचे परकीय चलन यांचा समावेश आहे.

जळगांव : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात, कोणत्याही पदासाठी किंवा मला काही बनायचे आहे म्हणून नाही तर नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी ही यात्रा करत आहे – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण.

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीवेळी दिग्विजय बागल यांच्यावर खुनी हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेले माजी आमदार जयंतराव जगताप यांना बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केले आहे.

क्रीडाविषयक : आगामी वेस्ट इंडीच दौऱ्यासाठी शुक्रवारी होणारी भारतीय संघाची निवड एका दिवस पुढे ढकलण्यात आली असून शनिवारी संघाची निवड होणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: