आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस,पोखरण अणुचाचणी ला 21 वर्ष पूर्ण

ग्लोबल न्यूज नेटवर्क: 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण जगातल्या कुठल्याही महाशक्ती देशाला थांगपत्ता न लागू देता 3 अणुस्फोट चाचण्या घेऊन जगाला आपल्या सैन्य आणि तंत्रज्ञानिक शक्तीची छोटीशी चुणूक जगाला पुन्हा दाखवून दिलेली. परत दोनच दिवसांनी अजून 2 अणुस्फोट करून 5 अणुस्फोटांचे मिशन अगदी गुप्तपणे यशस्वी केलेले.
आजचा दिवस या मोहिमेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्व. अटलबिहारी वाजपेयींजी, जॉर्ज फर्नांडिस, अब्दुल कलाम आणि पडद्यामागे राहून योगदान देणारे शेकडो सैनिक, वैज्ञानिक यांच्या अलौकिक धैर्याला आणि दुरदृष्टीला नमन करण्याचा दिवस. पोखरण चाचणीच्या सन्मानात 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणूनही साजरा केला जातो, समस्त भारतवासीयांना त्यानिमित्त शुभेच्छा।

admin: