आज ( रविवारी) बार्शीत राज्यस्तरीय मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन दोन खासदार राहणार उपस्थित

बार्शी: सकल मराठा समाज बार्शी तालुका व राजाभाऊ राऊत मित्र मंडळाच्या वतीने बार्शी 
येथे दिनांक २३ जून रोजी राज्यस्तरीय मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे.पदमकृष्ण मंगल कार्यालय उपळाई रोड येथे हा मेळावा होणार आहे. 

सकाळी १० वाजता मा आ राजेंद्र राऊत 
यांच्या हस्ते  या मेळाव्याचे उदघाटन होणार असून या  वेळी उस्मनाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, माढ्या चे खा. रणजितसिह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ  बारबोले,शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव उपाध्यक्ष नंदन  जगदाळे,शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ प्रकाश बुरगुटे,शिवसेना नेते पुरुषोत्तम  बरडे,जयकुमार शितोळे,संतोष दादा निंबाळकर,सकल मराठा समाजाचे माऊली पवार  आदींची प्रमुख उपस्तीथी  राहणार  आहे

या मेळाव्यात कोणतीही फी आकारली जाणार नसून राजाभाऊ राऊत मित्र मंडळाच्या  वतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून या मेळाव्यात मोठ्या  संख्येने वधू वरानी सहभागी होऊन या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे संयोजकांनी 
आवाहन केले आहे.

धिरज करळे: