आंधळकरांच्या सभेतील सोपलांची एन्ट्री अचानक की पूर्वनियोजित बार्शीत चर्चाना उधाण,आंधळकरांनी दिला सोपलांना पाठिंबा

ग्लोबल न्यूज नेटवर्क: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला,आणि गेल्या दहा वर्षांपासून बार्शीत शिवसेनेची खिंड लढवणारे भाऊसाहेब आंधळकर काहीसे अस्वस्थ झाले. अगोदर माझ्या राजकीय भवितव्याचे काय ते बोला मगच मी माझी भूमिका जाहीर करणार करणार अशी भूमिका घेत महाजनादेश सभा या नावाने आंधळकर यांनी बार्शीत आयोजित सभेत   एखाद्या चित्रपटात जशी नायकाची एन्ट्री होते तसाच काहीसा अनुभव काल बार्शीकरांनी घेतला .

अचानकच या सभेत माजी आमदार दिलीप सोपल हे स्टेजवर आले . दोन्ही नेते ‘मिलेसुर मेरा तुम्हारा’चा नारा देताना पहायला मिळाले आहेत.अशा पध्दतीने आंधळकरांनी सेनेचे दिलीप सोपल यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेत आपली तलवार म्यान केली.दरम्यान सोपलांची ही सभेतील एन्ट्री अचानक होती की पूर्वनियोजित होती हे मात्र त्या दोघांनाच माहीत. परंतु बार्शी करांना मात्र हे दोघे एकत्र आल्याचे पहावयास मिळाले.

दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे गेली आठ-दहा वर्षांपासून शिवसेनेची धुरा सांभाळणारे भाऊसाहेब आंधळकर नाराज असल्याचं बोलले जात होते. स्वतः आंधळकर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या मध्यस्थीने दोन्ही नेते एकत्र आले आहेत. जुन्या-नव्या शिवसैनिकांमध्ये मनोमिलन झाल्याने दिलीप सोपल यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपमध्ये असणारे राजेंद्र राऊत त्यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी आंधळकर यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं बोलले गेले. मात्र राजकारणातील डावपेचात मातब्बर असणारे दिलीप सोपल यांनी आंधळकर यांची नुसतीच भेट घेतली नाही, तर त्यांच्या आईचे आशीर्वाद परिवाराची खुशाली जाणून घेतली होती. दुसऱ्याबाजूने तानाजी सावंत यांच्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, विरोधकांकडून तालुक्यात केले जाणारे दहशतीचे राजकारण संपवण्यासाठी सोपल यांना समर्थन देत आहे. यापुढे सर्व शिवसैनिकांचा उचित सन्मान ठेवण्याचा शब्द त्यांनी दिला आहे, असं भाऊसाहेब आंधळकर सांगितले आहे. तर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहे, यापुढे शिवसेनेच्या विचारानुसार शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांचे प्रश्न एकत्र सोडवणार असल्याचं दिलीप सोपल म्हणाले आहेत.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: