बार्शी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व सी.बी.खेडगी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सी.बी.खेडगी महाविद्यालय, आक्कलकोट येथे झालेल्या व्हाॅलीबाॅल स्पर्धेमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या मूलींच्या संघानी प्रथम क्रमांक तर मुलांच्या संघानी द्वितीय क्रमांक मिळवला.
मुलींच्या विजयी संघात :- वैष्णवी बारंगुळे ,आचल वरपे ,साक्षी आवटे ,अंजली पालके , सोनाली रामगुडे, वैष्णवी घाडगे, नेहा पवार , हिमानी राऊत , शितल ठाकुर, पायल गपाट , दिक्षा धुमाळ ,करिष्मा आत्तार यांचा समावेश होता.
मुलांच्या उपविजेता संघात :- कुलदीप पवार ,रोहित झेंडे, प्रकाश गवळी,मनोज जाधव, क्षितिज लांडगे, तेजस गायकवाड , विठ्ठल जाधव, सुदर्शन अंधारे , घोडके अनंत, आनेकर किशोर, वैभव करडे, श्रीनाथ आळने यांचा समावेश होता.
विजयी संघास प्रा.डाॅ. सुरेश लांडगे,प्रा.डॉ.हरिदास बारसकर, प्रा.संजय पाटील, प्रा.विजयानंद निंबाळकर,प्रा.रामहरि नागटिळक यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष डाॅ.बी.वाय.यादव,उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव व्ही.एस.पाटील,सहसचिव पी. टी.पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर,संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.प्रकाश थोरात,डाॅ.भारती रेवडकर, उपप्राचार्य.व्ही.जे देशमुख, प्रबंधक प्रमोद जाधव,भाऊसाहेब पाटील,संतोष कवडे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.