अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना बार्शी तालुक्यासाठी ९४ विहीरींना मंजूरी ,वाचा सविस्तर-

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना बार्शी तालुक्यासाठी ९४ विहीरींना मंजूरी
माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी दिली माहिती
सुमारे तीन कोटींचे अनुदान मिळणार

बार्शी: ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी असलेल्या महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2018-19 अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेतून बार्शी तालुक्यातील विविध भागातील शेतकºयांच्या 94 विहीरी मंजूर झाल्याची माहिती भाजपा नेते माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली़या विहीरींसाठी शासनाकडून 2 कोटी 82 लाख रुपये अनुदान मिळणार आहे़
या योजनेचा लाभ तालुक्यातील ज्योतीबाची वाडी,गुळपोळी,उपळे दु, बोरगांव झा,गौडगांव,ताडसौंदणे, पानगांव,सावरगाव,रस्तापूर, पिंपळगाव पान, बाभळगाव,तुर्क पिंपरी, कोरेगाव,राळेरास,शेळगांव आर,भातंबरे,सासुरे,बावी आ इत्यादी गावातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.
तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल,ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे,पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे राऊत यांनी आभार मानले
यावेळी पं.स.उपसभापती अविनाश मांजरे,संतोष दादा निंबाळकर,पं.स.सदस्य अनिल काका डिसले,जि.प.सदस्य मदन दराडे,किरण मोरे,समाधान डोईफोडे,इंद्रजित चिकणे, राजाभाऊ धोत्रे,प्रमोद वाघमोडे,गणेश बारंगुळे,सुमंत गोरे,झुंबर दादा जाधव,वासुदेव गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: