गृहमंत्री अमित शाह काश्मीर दौऱ्यावर, 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ‘असे’ घडले

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. गेल्या 30 वर्षांच्या काळात फुटिरतावादी संघटना गृहमंत्री आल्यावर बंद पुकारत होत्या. 30 वर्षात पहिल्यांदाच फुटिरतावादी संघटनांनी बंद पुकारलेला नाही.

यापूर्वी जेव्हा जेव्हा गृहमंत्री जम्मू-काश्मीरला भेट देत होते, तेव्हा तेव्हा फुटिरतावादी नेत्यांनी बंद पुराकलेला होता. आज आमित शाहांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी अमित शाहांनी सुरक्षा आणि विकासासंबंधी योजनांवर बैठका घेतल्या.

अमित शाहांनी सुरक्षेसंबंधीत बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच अमरनाथच्या यात्रेकरुंच्या सुरक्षेबाबतही चौकशी केली आहे. त्यांच्या सुरक्षेबाबतच्या सूचनाही सुरक्षा यंत्रणा प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

यासोबतच संभाव्य दहशतवादी हल्ल्यांची ठिकाणे आणि ज्या ठिकाणांहून घुसखोरी होते अशा संवेदनशील ठिकाणावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेशही शहा यांनी दिले.

या दौऱ्याची विशेषता म्हणजे कोणत्याही फुटिरतवादी नेत्याने शहा यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवण्यासाठी बंद पुकारलेला नाही. हुर्रियत कॉन्फरन्सचे सैयद अली शाह गिलानी किंवा मीरवाइज उमर फारुख किंवा इतर कोणत्याही नेत्याने बंदचे आवाहन केलेले नाही.

एवढेच नाही तर कोणत्याही फुटिरतावादी नेत्याने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही. गेल्या तीन दशकांमध्ये केंद्र सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीच्या दौऱ्यादरम्यान फुटिरतावादी बंद पुकारत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 फेब्रुवारी रोजी काश्मीरच्या दौऱ्यावर होते. या वेळी गिलानी, मीरवाइज आणि जेकेएलएफचे प्रमुख यासीन मलिक यांच्या संघटनांनी काश्मीर खोऱ्यात बंद पुकारला होता.

यासोबतच तर 10 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या काश्मीर दौऱ्यादरम्यानही बंद पुकारण्यात आला होता. या उलट अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान मात्र फुटिरतावादी नेत्यांनी मौन पाळणे पसंत केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: