अहिल्यादेवी जयंती: मल्हार आर्मीकडून डिजिटल आहिल्या महोत्सवाचे आयोजन; तब्बल दीड लाखांची बक्षिसे

यंदा प्रथमच डिजिटल साजरी होणार अहिल्यादेवींची जयंती; एक लाख बक्षिसांच्या डिजिटल स्पर्धा

उस्मानाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर सरकारने बंदी घातलेली असल्यामुळे
31 मे असणारी राष्ट्रमाता अहिल्यामाता होळकर यांची जयंती ही सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता या दिवशी सर्व आहिल्या प्रेमी नागरिकांनी डिजिटल जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जयंतीनिमित्त एक लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या विविध स्पर्धांचे ही डिजिटल स्वरूपात आयोजन केले असल्याची माहिती मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेशभाऊ कांबळे यांनी दिली.

दरवर्षी 31 मे ला संपूर्ण देशात आहिल्या प्रेमी नागरीक विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करतात. मात्र यंदा कोरोनामुळे मल्हार आर्मी तर्फे महाराष्ट्रातील व भारत वर्षातील पहिली DIGITAL अहिल्यादेवींची जयंती साजरी केली जाणार आहे.

या डिजिटल अहिल्यामोहोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे.यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, ओवी गायन स्पर्धा,नृत्य(डान्स)स्पर्धा ,एकांकीका सादरीकरण व समुह नाट्य स्पर्धांचा समावेश केला आहे.

या स्पर्धेत सर्व वयोगटातील बंधू-भगिनींनी सहभाग नोंदवून जयंती साजरी करावी.या डिजीटल अहिल्यामोहोत्सव स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विजेत्यांना एक लाख 56 हजारांची बक्षिस ठेवण्यात आली आहेत. विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह व सन्मान पत्र दिले जाणार असल्याचे ही मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत उर्फ सुरेश भाऊ) कांबळे
यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: