असा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान-समान कार्यक्रम; शेती, व्यापार, रोजगार केंद्रस्थानी

असा आहे महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम

महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या पूर्वी महाआघाडीने आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकातील मुल्यांना धरून राज्याचा विकास करण्यात येईल, अशी माहिती महाविकास आघाडी आणि आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

देशातील राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रतिबिंब अशी आघाडी करण्याच्या उद्देशाने किमान समान कार्यक्रम आखणी करण्यात आली आहे.

राज्यातील महिनाभराच्या सत्तासंघर्षानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाराष्ट्र विकास आघाचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे.

शपथविधीपूर्वी  संयुक्त पत्रकार परिषदेत या नव्या आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नोकऱ्यांमध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना संधी मिळावी म्हणून कायदा आणि १० रुपयांत थाळी हे या किमान समान कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याचसोबत राज्यातील महिला सुरक्षितता आणि आरोग्य सुविधा यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचा मानस ठेवण्यात आला आहे.

किमान समान कार्यक्रमातील केंद्रस्थानी घटक

शेतकरी, शतमजूर, व्यापारी आणि लघु-मध्यम व मोठे उद्योग
-शिक्षण आरोग्य आणि रोजगार
 -धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट
-महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणार
-आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य

ग्लोबल न्युज नेटवर्क: