चांदीचा मास्क वापरणारा माहाराष्ट्रातील अवलिया
रत्नागिरी – अशी ही हौस!रत्नागिरी तील मांडवी येथे रहाणारे शेखर यशवंत सुर्वे यांनी खास कोल्हापूर येथून हा चांदीचा मास्क तयार करून मागविला आहे.
या बाबत माहिती देताना शेखर सुर्वे यांनी सांगितले की एक आवड म्हणून हा मास्क घेतला तो ६० ग्राम चा असून त्याची किंमत ३९०० रुपये आहे
त्यांनी एक फोटो मोबाईल वर बघितला होता तसा मास्क त्यांना हवा आहे म्हणून त्यांचा सोनार हंसराज जेवलर्स याना दाखवला व त्यांनी तो कोल्हापूर हून मागवून घेतला
केवळ एक हौस म्हणून आपण तो घेतल्याचे त्यांनी सांगितले
हौसेला मोल नाही म्हणतात हेच खरं