अरुण जेटलींनी केली राजकारण निवृत्ती ची घोषणा ,कोणतीही जबाबदारी देऊ नये अशी मोदींना केली विनंती

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून निवृत्तीची घोषणा केली आहे. अरुण जेटलींनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पंतप्रधानांना कोणतीही जबाबदारी न देण्याचे आवाहन केले आहे.


अरुण जेटलींनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र


मागच्या पाच वर्षांत तुमच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचा भाग असणे माझ्यासाठी अभिमानास्पद राहिले आहे. मागच्या 18 महिन्यांपासून मला प्रकृतीच्या गंभीर त्रासांना सामोरे जावे लागले आहे. माझ्या डॉक्टरांनी यापैकी बहुतेक त्रासांतून सुटका करण्यास माझी मदत केली आहे. मला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याबाबत मी तुम्हाला प्रचार मोहिमेतच तोंडी सांगितले होते. नवे सरकार उद्या शपथ घेणार आहे. यामुळे मी औपचारिकता म्हणून तुम्हाला पत्राद्वारे याबाबत विनंती करत आहे. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला सध्याच्या तसेच नव्या सरकारमध्येही कोणतीही जबाबदारी देण्यात येऊ नये. मला माझ्या उपचारांसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यामुळे मी तुम्हाला यासाठी विनंती करत आहे.
– अरुण जेटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17व्या लोकसभेच्या पंतप्रधानपदाची 30 मे रोजी शपथ घेत आहेत. यावेळी पंतप्रधानांसोबत कोणकोणते मंत्री शपथ घेणार यावर माध्यमांचा काथ्याकूट सुरू आहे. अनेक जुने चेहरे कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अरुण जेटलींनी पत्र लिहून स्वत:हून जबाबदारी न देण्याची विनंती केल्यामुळे नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात जेटली नसणार हे स्पष्ट झाले आहे

admin: