अमित शहा, फडणवीस यांची उपस्थिती ,दिल्लीतील भाजपची बैठक चालली तब्बल नऊ तास

केंद्रीय गृहमंत्री, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसंदर्भात विशेष बैठक दिल्लीमध्ये झाली. गुरुवारी दुपारी झालेल्या या बैठकीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत दिल्लीत पोहोचले. दिल्लीमध्ये तब्बल 9 तास ही बैठक चालली.

जम्मू-कश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यासंदर्भात अमित शहा यांचे मुंबईत व्याख्यान पार पडले. या व्याख्यानानंतर अमित शहा निवडणुकीसंदर्भात बैठक घेतील अशी अटकळ बांधण्यात आली होती, मात्र तसे काहीही झाले नाही. त्यानंतर अमित शहा यांचा 26 सप्टेंबर रोजी दौरा जाहीर झाला होता, मात्र हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. या दौर्‍यात शिवसेना-भाजप युती तसेच निवडणुकीतील उमेदवारीसंदर्भात चर्चा होणार होती. आता हिच चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री गुरुवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले.

गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत अमित शहांसोबत ही बैठक सुरू होती. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य काही महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये नक्की काय झाले याबाबत अद्याप मुख्यमंत्री आणि शहा यांच्याकडून किंवा बैठकीत उपस्थित कोणाकडून माहिती देण्यात आलेली नाही.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: