अमित शहांना झोपेत ही 370 म्हणून चावळत असतील-शरद पवारांची खोचक टीका

बार्शी: आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला आहे.

तसेच भाजपचे नेते निवडणूकच नाही असे म्हणत आहेत मग दिल्लीतील भाजप नेते इथे पर्यटनाला की राज्य पाहायला येतात अशी टीका शरद पवारांनी केली.सोलापूरमधील बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. 

शरद पवारांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या माजी मंत्री दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बार्शीत राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. ‘मुख्यमंत्री म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीसाठी कोणी समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते. अशांची (हातवारे करून) होत नाही,’ अशी टीका पवारांनी केली. पवारांच्या या वाक्यावर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.


आम्ही सत्तेत असताना 70 हजार कोटींची कर्जमाफी केली. मात्र आत ऑनलाईन कर्जमाफी आली आहे. शेती व शेतकरी अडचणीत आहे. 16 हजार शेतकर्‍यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत मग ही कसली कर्जमाफी. शेतकर्‍यांची फसवणूक करणारी यांच्यासारखी दुसरी राजवट नाही, अशी टीका पवार यांनी केली. आम्ही आजवर टेंभुर्णी, इंदापूर, कुरकुंभ, चाकण आदी कितीतरी औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. हजारो कारखाने काढून हजारो हातांना काम दिले. यांच्या राजवटीत कारखाने बंद पडायला लागले आहेत. आर्यन कारखानाही बंद आहे मग यांना मत का द्यायचे असा प्रश्‍न उपस्थितीत केला.

मुख्यमंत्र्यांचे नागपूर हे गुन्हेगाराचे केंद्र बनले आहे. भाजपाचे अनेक स्वामी महिलांवर अत्याचार करीत आहेत. अशा बेशरम माणसांना त्यांची जागा दाखवा. महिलांना सन्मान नाही हाच का शिवछत्रपतींचा आदर्श, काय चाललय या राज्यात?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिकडे जाईल तिकडे 370- 370 असे करीत आहेत. काश्मीरमधील 370 रद्द केले त्याचा आम्हाला आनंद आहे व आमचा पाठिंबाही आहे. पण कोण चाललय जमीन घ्याला काश्मीरला. दिवसरात्र अमित शहा 370- 370 म्हणत आहे. रात्री झोपेतही 370 म्हणत असेल, अशी टीका करत काय म्हणावयाचे या गड्या असे पवार म्हणाले. 9 राज्यातील 371 कलमही काढा असेही पवार म्हणाले.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: