महाआघाडीच्या जाहिरनाम्यात केवळ ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासन शिल्लक – मुख्यमंत्री

अकोला । निवडणुका कुणासोबत लढायच्या हेच कळत नाही. आमचे पैलवान तयार आहेत. पण समोर कोणीच नाही. काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीला लगावला. ते अकोल्यातील अकोट मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रकाश भारसाखळे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, और बाकी मेरे साथ आओ, अशी झाली आहे. पुढील पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही, याची जाणीव असल्यानेच आघाडीने जाहीरनाम्यात भरमसाट आश्वासने दिली असून, आता केवळ ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासन शिल्लक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी अकोल्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटिल यासह आदींची उपस्थिति होती.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: