अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला, राज्यपाल म्हणाले मी नक्की लक्ष घालतो

अमित ठाकरे राज्यपालांच्या भेटीला, मांडला हा विषय…!

राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अमित हे राजभवनात गेले होते. ‘कोविड योद्धा’ असलेल्या निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती करणारे पत्र अमित ठाकरे यांनी राज्यपालांना दिले.

संपूर्ण देशात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या वैद्यकीय लढाईत सुमारे 2500 निवासी डॉक्टर्स दिवसरात्र रुग्णसेवा बजावत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी – निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे.

ही परीक्षा आता 15 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना 24 तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही” असे मत अमित ठाकरे यांनी पत्रात मांडले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: