गेल्या काही महिन्यांपासून यश हुलकावणी देणाऱ्या सिंधू ने अभिमानास्पद कामगिरी केली. यंदाच्या बॅडमिंटन स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या पी. व्ही. सिंधूने रविवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या नाओमी ओकुहार हिचा २१-७.२१-७ असा ‘वन साइड’ पराभव करून जागतिक विजेतेपदाला गवसणी घातली.
यामुळे भारतीय क्रीडा रसिक ‘वेल डन सिंधू’ म्हणून मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहेत.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
सिंधूची भरारी
जागतिक बॅडमिंटन विजेती, दोनदा उपविजेती, दोनदा ब्राँझ वर्ल्ड टूर स्पर्धेत विजेती ऑलिंपिक उपविजेती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 1 रौप्य पदक 1 ब्राँझ पदक
आशियाई क्रीडा स्पर्धेत एक ब्राँझपदक अशी भारतीयांना अभिमानास्पद कामगिरी बजावून भरारी घेतली आहे.
सिंगापूर ओपन स्पर्धेत सिंधूला ओकुहरा विरुद्ध हार स्वीकारावी लागली होती. पण गत वर्षीच्या अखेरीस झालेल्या वर्ल्ड टूर फायनलच्या निर्णायक लढतीत सिंधूने आपण महत्त्वाच्या लढती जिंकतो हे दाखवून दिलं होतं. आणि त्याचीच पुनरावृत्ती रविवारी झाली .जागतिक बॅडमिंटन मधील मधील भारताचं पहिलं जागतिक विजेतेपद सिंधू ने जिंकलं.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.