अबब ! दोन एकरात 70 लाखांचे पेरू; बार्शीतील शेतकरी दाम्पत्याने साधली किमया; वाचा सविस्तर-

इस्राईल पद्धतीने केली लागवड; दोन एकरांत घेतले ३६ लाखांचे पेरू

निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते यात आर्थिक गणित कोलमडते त्यामुळे शेतकऱ्यांनी परंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पर्यायी पिके घ्यावीत. निसर्गाची वारंवार हुलकावणी शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव वडिलार्जित २६ एकरांत पारंपरिक पिकांशिवाय फारसे काही पिकायचे नाही सीताफळाला फाटा देत दोन एकरांत थाई वाणाच्या पेरुची लागवड केली एक एकरात १८ लाखांचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे वाणेवाडी येथील एका युवा शेतकऱ्याने. खंडेराव दत्तात्रेय लवांड असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

बार्शी तालुक्यातील कुसळंबपासून चार किलोमीटरवर वाणेवाडी हे गाव आहे़ गावातील शेतकऱ्यांचा सारा कल सीताफळ लागवडीकडे आहे़ परंतु खंडेराव लवांड यांनी पत्नी जयश्रीच्या मदतीने शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी थाई वाणाच्या पेरूची लागवड करुन एकरी १८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

शासनाचे कोणतेही अनुदान न घेता दोन वर्षांपूर्वी ‘थाई’ वाणाच्या पेरुची लागवड केली. पहिल्याच वर्षी त्यांनी एकरी सहा लाखांचे उत्पादन मिळवले अतिशय कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात सीताफळापेक्षाही दुपटीने उत्पादन मिळाले संपूर्ण तालुक्यात थाई वाणाच्या पेरूची पहिली बाग फुलविण्याचा प्रयोग युवा शेतकरी खंडेराव यांनी केला थाई वाणाचा प्रसार इतका झाला की बाजारपेठेत जाण्याऐवजी बाहेरील व्यापारी बांधावर येऊन ४० रुपये दराने फळं घेतली़ त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाचला. त्यामुळे एकरी १८ लाखांचे उत्पादन मिळाले़ मात्र एका एकरावरील लागवडीला सरासरी एक लाख रुपये खर्च आला.

या लागवड खर्चात ५० हजार हे मशागत आणि फवारण्यांसाठी तर ५० हजार रुपये मजुरीवर खर्ची झाले. पेरूच्या झाडांना कॅल्शियम पोटॅश मायक्रोन्यूबची आवश्यकता असते़ या पेरूच्या बागेवर भुरी व मिलीबग हे रोग पसरतात. या फळात बिया नरम असतात हे या फळाचे वैशिष्ट्य़ पेरूचे वरील आवरण जाड असल्याने हे फळ काढणीनंतर जवळपास २० दिवस टिकून राहते़ तसेच त्यात गराचे प्रमाण जास्त असून, चवीला अतिशय गोड आहे. या पेरुची विक्रीही सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे़ स्थानिक पातळीवर बार्शी बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात हा पेरू विकला जातोय.

इस्राईल पद्धतीने लागवड
दोन ओळींमधील अंतर दहा फूट तर दोन झाडांमधील अंतर पाच फूट राखून पेरुची लागवड केली. एका एकरात ८०० रोपे लावली ही सर्व लागवड इस्राईल पद्धतीने केली़ त्यांनी दोन एकरांत १६०० रोपे लावली़ केवळ सहा महिन्यांतच फळधारणा होण्यास सुरुवात झाली़ झाडं एक वर्षाची झाली आणि प्रत्येक झाडाला ४० ते ४५ किलो उत्पादन निघाले़ दुसऱ्याच वर्षी प्रत्येक झाडाला किमान १०० किलो माल निघाला सुरुवातीला ६० रुपय दर मिळाला. अशी माहीती खंडेराव लवांड यांनी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: