अधिकार्याच्या दुर्लक्षामुळे लाडोळे तलावाचा भराव फुटला
बार्शी:
जलसंधारण विभागातील शाखा अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे बार्शी तालुक्यातील लाडोळे येथील सदानंद महाराज देवस्थानसमोरील पाझर तलावाचा भराव मधूनच फुटल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सरपंच काकासाहेब गुंड म्हणाले की, गेल्या 4 वर्षापूर्वी या तलावाचा भराव खचला होता. आम्ही वेळोवेळी शाखा अभियंता पारसे यांच्याकडे पाठपुरावा केला.
मात्र त्यांनी इस्टीमेट बसत नाही, निधी नाही असे कारणे देत टोलवाटोलवी केली. त्यामुळे गावकर्यांनी सांडव्याची उंची कमी केली. दरवर्षी पावसाने भराव खचत गेला व यावर्षी हा तलावच फुटल्याने सर्व पाणी वाहून गेले व शेतकर्यांचे 200 एकर शेतीचे मोठे नुकसान झाले.या पाण्यामुळे कांदा, सोयाबीन,द्राक्ष बागांचे नुकसान झाले.
मतदान प्रक्रिया झाल्यानंतर महायुतीचे उमेदवारदिलीप सोपल यांनी तलावाला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वैराग भागातील पदाधिकारी उपस्थित होते.