एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
अजून बरेच लोक शिवसेनेत यायचे बाकी – उद्धव ठाकरे
मुंबई । आम्ही कुणाला हरवण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढत असतो. त्यामुळेच चांगली लोकं आमच्याकडे येत आहेत. अजून बरेच लोक शिवसेनेत यायचे बाकी आहेत, असं सांगतानाच आम्हाला जिंकायचं आहे. कुणाचं वाईट करणं हे आमचं उद्दिष्टं नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मीडियाशी संवाद साधतना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाराष्ट्र पोलीस दलाचे माजी अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
‘बाळासाहेबांचा माझ्यावर प्रभाव होता, त्यांच्यासाठी मी मुलासारखा होतो. उद्धव ठाकरे हे मला भावासारखे आहेत’, असं मनोगत यावेळी प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केलं. ‘अजूनही काही लोक शिवसेनेत येणे बाकी आहेत’, असं सूचक वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केलं. प्रदीप शर्मा आगामी विधानसभा निवडणूक पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघातून लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून ते बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.