मुंबई | अजित पवारांना भाजपकडून मोठं रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. सिंचन घोटाळ्याची चौकशीची फाईल बंद करण्यात आली आहे. विदर्भ पाटबंधारे अंतर्गत सुरू असलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची फाईल नस्तीबंद करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यात शासनाने काही नियम किंवा न्यायालयाने काही निर्देश किंवा आदेश पारीत केले तर हा निर्णय आदीन राहून आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी करण्यात येईल या अटीवर नस्तीबंद करण्याते निर्देश देण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे 2012 मध्ये विधानसभेत विरोधी बाकावर होती. यावेळी त्यांच्याकडून अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केले जात होते. मात्र ते आता दोघांनीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता ते एकाच बाकावर दिसणार आहेत. याच काळात भाजपकडून अजित पवारांना मोठा रिटर्न गिफ्ट मिळाले आहेत. राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी फाईल बंद करण्यात आली आहे.