अजित डोवाल कश्मीरमध्ये तळ ठोकून; जवानांची भेट, स्थानिकांसोबत भोजन

कलम 370 रद्द करून जम्मू-कश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याचा निर्णय झाल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट होत आहे. पाकिस्तान प्रत्यक्ष सीमारेषेवर मोठा घातपात करण्याची शक्यता आहे. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचाही घाट पाकिस्तानने घातल्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे जम्मू-कश्मीरमध्ये तळ ठोकून आहे.

सोमवारपासून अजित डोवाल जम्मू-कश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत. मंगळवारी त्यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती सामान होताना दिसत आहे. बुधवारी अजित डोवाल यांनी शोपिया जिल्ह्यातील स्थानिक लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्यासोबत एकत्रित भोजन घेतले. तसेच डोवाल यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची आणि जवानांची भेट घेतली.

जम्मू-कश्मीर पोलीस, लष्करी जवान राज्यातील परिस्थितीवर बारील लक्ष ठेऊन आहे. कोणत्याही अप्रिय घटनेचा सामना करण्याची सर्वांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्व सुरक्षा विभागांमध्ये समन्वय साधून कार्य करण्याचे आदेश डोवाल यांनी दिले आहे. तत्पूर्वी डोवाल यांचे जम्मू-कश्मीरमध्ये आगमन होण्यापूर्वी अतिरिक्त 8 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: