बार्शीत वंचित आघाडी तर्फे इफ्तार पार्टी

बार्शी: बार्शी शहर व तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतीने रमजान निमित्त हिंदू-मुस्लिम समाज बांधवासाठी आयोजित रोजा इफ्तार पार्टीमध्ये शेकडो बांधवानी सहभाग घेतला.
प्रारंभी आघाडीचे अध्यक्ष शंकर वाघमारे व मार्गदर्शक विवेक गजशिव यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोहेब सय्यद ,दयावान कदम, जुबेर तांबोळी, राहुल बोकेफोडे, मुस्लीम समाजातील प्रमुख मान्यवर इरफान शेख, गुलमंह मंद आतार, तोसिफ बागवान, जमीर शेख ,नदीम नाईकवाडी ,अॅड मुजाहिद तांबोळी, पिनु काकडे, दिपक ढावारे, रुपेश बंगाळे, अश्पाक काझी, युन्नुस शेख ,वाहब येडशीकर सोहेल सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी देशातील एकता अखंड राहावी यासाठी प्रार्थना केली.

admin: