अखेर कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराने घेतला मोकळा श्वास,मिरज-रुकडी रेल्वे सेवा ही सुरू

गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला. महापुराने अतिगंभीर परिस्थिती झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आता हळूहळू पूर ओसरत असून रस्ते वाहतुकीसाठी खुले होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यात असलेले कोल्हापूरचे प्रवेशद्वार आता मोकळा श्वास घेत आहे. येथील पाणी ओसरू लागले आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे मिरज ते कोल्हापूर मार्गावरील रेल्वे सेवा गेल्या सात दिवसापासून बंद आहे.  रेल्वे प्रशासनाने आज १२ ऑगस्ट रोजी  मिरज ते रूकडी दरम्यान संध्याकाळी ५ वाजता पहिली पॅसेजर सोडण्यास ग्रीन सिग्नल दाखवल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे. 

लवकरच या मार्गावर रेल्वेसेवा  सुरु होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या मार्गावरील कृष्णा व  पंचगंगा  या दोन नद्यांवर ब्रिटीशकालीन रेल्वे पूल आहेत. त्यांची कालमर्यादा संपली असून, प्रत्येकी १०० वर्षाचा टप्पा त्यांनी केव्हाच पूर्ण केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पूलाने पाण्याची धोक्याची पातळी  ओलांडल्याने रेल्वे प्रशासनाने सर्व प्रकारची वहातूक थांबवली होती. आज पूराचा सातवा दिवस असून, अजूनही पूराच्या पाण्याची पातळी ५० फुटावर आहे. परंतू २००५ च्या पुरावेळी ही पातळी ४५ फुटावर होती. म्हणजे अजूनही जवळपास ५ फूट पाणी वाढून आहे. 

रेल्वे पूलाच्या  पूर्वेस रूकडी गाव असून, या भागातील दगडी पूल परिसरात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. हीच अवस्था रेल्वे पूलाच्या पश्चिमेस चिंचवाड गेट अलिकडील रेल्वे ट्रॅक पूर्णतः पाण्याखाली गेल्याने रूळाखालील स्लीपर  खालील खडी वाहून गेली होती. काल ११ ऑगस्टपासून रेल्वे खात्याने या भागातील  नवीन खडीचा भराव टाकला असून लवकरच रेल्वे सेवा सुरू होवू शकते असे  रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. 

सदर  रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती रेल्वे  प्रशासनाच्या वतीने श्रावणलाल भिल यांनी दिली आहे. ज्ञानेश्वर आंधळे,  के. आर. डांगे, रूपसिंग राठोड, शंकर केसरकर,  रेल्वे सुरक्षा दलाचे जवान व या कामासाठी जवळपास १५o रेल्वे कर्मचारी कार्यरत आहेत. आज रेल्वे प्रशासनाने  कृष्णा नदीवरील  पूल व सध्यपरिस्थितीची पाहणी करून कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे. 

सध्या  पहिल्या टप्यात मिरज  ते रुकडी या दरम्यान  पहिली पॅसैजर आज  सोडण्यात आलेने रेल्वे  प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. येत्या दोन दिवसात रुकडी ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: