देशातील लोकशाही मोडून काढली आहे का ? फोन टॅपिंग, शेकरी आंदोलांवरून राऊतांची मोदी सरकारवर टीका !

 

नवी दिल्ली | फोन टँपिंग, शेतकरी अंदोलन आणि त्यांच्या प्रश्नाबाबत विरोधकांकडून चर्चेची मागणी केली जात स्तन दुसरीकडे मात्र मोदी सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. फोन टॅपिंग प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले कि, ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राण दिले त्या सध्या देशात लोकशाही धोक्यात आहे. केंद्र सरकारने देशातील लोकशाही मोडून काढली आहे का?

आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले कि, विद्यमान सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही. हे सरकार सतेत आल्यापासून जाणवत आहे. पेगाससच्या चर्चेबाबत विरोधकांची मागणी साधी आहे. मात्र, त्यावरही चर्चा करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. पेगाससचा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. आम्हाला खात्री आहे कि आमची भूमिका न्यालयात मंडळी जाईल. हेरगिरीच्या जे कांड झालेले आहे ती जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार नाही का?

शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तोही राष्ट्रीय मुद्दा आहे. याप्रश्नी चर्चा होणे गरजेची आहे. 125 कोटींचा देश आहे. यात लोकशाही, स्वातन्त्रासाठी अनेकांनी आपले प्राण दिले आहेत. मात्र, यादेशात लोकशाहीबाबत बोलण्यास तयार नाही. लोकशाहीवर चर्चा करायची झाल्यास आम्ही सांगू तीच लोकशाही हे सरकारचे धोरण असल्याची टीका राऊतांनी यावेळी केली.

Team Global News Marathi: