‘मिशन झिरो’ आपण एकत्रित साध्य करू ! – जयंत पाटील

‘मिशन झिरो’ आपण एकत्रित साध्य करू ! – जयंत पाटील

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ५१७ कोरोना बाधित उपचाराखाली आहेत. तर ३ हजार ७० रूग्ण बरे झाले आहेत. ‘मिशन झिरो’ हे लक्ष आपण एकत्रित साध्य करू.

शासकीय रूग्णालयांमध्ये कर्मचारी वर्ग अपूरा पडत आहे याचा सविस्तर आढावा घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना सूचना केल्यात. यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल.

सांगली व मिरज येथील ऑक्सीजन प्लँटची क्षमता वाढविणे, जादा दराने बिलांची आकारणी होऊ नये यासाठी खाजगी रूग्णालयांवर शासकीय ऑडीटर नेमणे, रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा उंचावणे, रूग्ण मृत झाल्यास स्वॅबचा अहवाल येण्यामध्ये होत असलेला विलंब कमी करावा याबाबत निर्देशित केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: