मुलींच्या लग्नाचे वय वाढवणार, मोदींनी दिले संकेत….!

मुलींच्या लग्नाचे वय वाढवणार, मोदींनी दिले संकेत….!

ग्लोबल न्यूज: मुलींच्या मृत्युदर कमी करण्यासाठी देशात मुलीच्या लग्नाचे वय वाढवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात सांगितले. त्यामुळे आता मुलीच्या लग्नाचे किमान वय १८ वर्षांऐवजी २१ वर्षे होण्याची शक्यता आहे.

भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळ्यानिमित्त देशाला संबोधित करताना मोदींनी हे संकेत दिले.आपल्या मुलींच्या लग्नाच्या किमान वयाचा पुनर्विचार करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत योग्य निर्णय घेऊ, असे मोदी म्हणाले.

सध्या देशात मुलीच्या लग्नाचे वय १८ वर्षे आहे तर मुलाच्या लग्नाचे वय २१ वर्षे आहे. मातृ मृत्युदर कमी करण्यासाठी मुलीच्या लग्नाचे वय वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

मुलीच्या लग्नाचे किमान वय किती असावे, याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुलीने आई बनण्यासाठी योग्य वय काय असावे, याबाबतचा सल्ला देण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मागच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: