युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा

युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. एएपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: