मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका पोहचण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका पोहचण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर

जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीविताला धोका पोहचवण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. या संदर्भात जादूटोणा करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी बोईसर येथून अटक केली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जव्हार पोलीस स्थानकांच्या हद्दीतील एका घरात तांदळामध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेऊन अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा किंवा मोठी इजा व्हावी या करिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात होता.

अघोरी पूजा करणाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता.

याप्रकरणी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून दोघांना रंगेहाथ अटक केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: