सेल्फीचा नादात पाय घसरून पडल्याने भिडे पुलावरून दोन तरुण गेले वाहून

सेल्फीचा नादात पाय घसरून पडल्याने भिडे पुलावरून दोन तरुण गेले वाहून

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध भिडे पुलावरून दोन तरुण वाहून गेल्याची घटना उघडकीस आली.सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत असताना यातील एक तरुण पाण्यात वाहून गेला त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा तरुणही नदी पात्रात वाहून गेला.

आज, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून या तरुणांचा शोध घेतला जात आहे.

मागील दोन दिवसात पुणे जिल्ह्याचा धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे हे मोहक रूप पाहण्यासाठी तरुण तरुणी या ठिकाणी गर्दी करत आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटाव, मंत्री मंडळात झाली चर्चा

हे दोन तरुण बाबा भिडे पुलावर आले होते. त्यातील एक जण सेल्फी घेत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेल्या मित्राने पाण्यात उडी मारली असताना तोही पाण्यात वाहून गेला.

त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली.दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून सध्या या मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

घटस्थापना कशी करावी.? जाणून घ्या : नवरात्र उत्सव पूजा विधी आणि शुभ मुहूर्त.!

ग्लोबल न्युज नेटवर्क: