दोन दिवसानंतर देखील डीलीट करता येणार पाठवलेले मेसेज

 

मुंबई | वॉट्सअपचे लवकरच एका नवीन अपडेटच्या माध्यमातून हे फिचर युजर्सच्या भेटीला येईल. या अपडेटनंतर तुम्ही कोणताही मेसेज दोन दिवसानंतर देखील डिलीट करताना येणार आहे. यासाठी कंपनी ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचरमधील वेळ मर्यादा वाढवणार आहे.

सध्या एक तास, आठ मिनिटं आणि १६ सेकंदांची ही मर्यादा दोन दिवस आणि १२ तास केली जाईल. यामुळे चुकून गेलेला किंवा गेलेला चुकीचा मेसेज तुम्ही दोन दिवसानंतर देखील डिलीट करू शकाल. वॉट्सअपच्या बीटा व्हर्जन 2.22.410 मध्ये सध्या हे फिचर दिसत आहे.

तसेच लवकरच सर्वसांसाठी हे फिचर उपलब्ध होऊ शकतं. याआधी देखील डिलीट फॉर एव्हरीवन फिचरच्या कालावधीत कंपनीनं असा बदल केला होता. त्यामुळेच सध्या उपलब्ध असलेली एक तासांची मर्यादा आली आहे. परंतु तरीही यात अजून वेळ देण्यात यावा अशी मागणी वॉट्सअप युजर्स करत होते.

हे फिचर उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही पाठवलेले टेक्स्ट, मीडिया फाईल किंवा डॉक्युमेंट्स देखील दोन दिवस आणि 12 तासांच्या आत कायमस्वरूपी डिलीट करता येतील. एकदा का तुम्ही या फिचरचा वापर करून मेसेज डिलीट केला कि तो रिसिव्हरच्या फोनमधून देखील गायब होईल.

Team Global News Marathi: